महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून माळवट्यात तरुणाचा खून, खिशातील चिठ्ठीवरुन झाला उलगडा - hingoli love murder latest news

याप्रकरणी मृताची बहिण सुनीता मुक्ताजी दुधमल यांच्या फिर्यादीवरून उर्मिला लडके, राजा लडके, गजानन लडके या तीन आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेत न्यायालया समोर हजर केले असता त्यांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

प्रेम प्रकरणातून माळवट्यात तरुणाचा खून
प्रेम प्रकरणातून माळवट्यात तरुणाचा खून

By

Published : Jul 18, 2020, 11:14 AM IST

हिंगोली -वसमत तालुक्यातील माळवटा येथे प्रेम प्रकरणातून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना 16 जुलैला पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह इतर तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने मृतास जीवित असताना बेदम मारहाण केली होती. तेव्हापासून तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता, त्यामुळे त्याने आपल्या खिशात आरोपीच्या नावांची चिठ्ठी लिहिली होती. त्यात यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे लिहून ठेवले होते. सुनील नामदेव साळवे (३०) असे मृताचे नाव आहे.

प्रेम प्रकरणातून माळवट्यात तरुणाचा खून

या घटनेची मिळालेली माहिती अशी,की मृताचे आरोपीच्या बहिणी सोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण तिच्या भावाला लागली होती. तेव्हापासून ते सुनीलला अनेकदा समजावून सांगण्याचा ही प्रयत्न केला होता. मात्र, यांचे प्रेमसंबंध कमी होत नव्हते. शेवटी त्याने सुनीलचा काटा काढण्याचा निश्चय केला. अन तो तसे नियोजन करू लागला. सुनीलने मरणाच्या आदल्या दिवशी काही मित्रांसोबत पार्टी केली आणि लागलीच दुसऱ्या दिवशी त्याचा खून झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असता पोलिसांनी सुनील सोबत पार्टी केलेल्या मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, त्यांना या प्रकाराची काहीही माहिती नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले शेवटी त्या तिघांनाही सोडून दिले.

याप्रकरणी मृताची बहिण सुनीता मुक्ताजी दुधमल यांच्या फिर्यादीवरून उर्मिला लडके, राजा लडके, गजानन लडके या तीन आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेत न्यायालया समोर हजर केले असता त्यांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details