हिंगोली -तालुक्यातील लोहगाव शिवारातील विहिरीत जवानाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मित्रानेच काटा काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मित्रा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बंडू श्यामराव चव्हाण, असं आरोपी मित्राचं नाव आहे. मयत राजकुमार पवार हे आपला मित्र बंडू चव्हाण यांच्यासोबत मंगळवारी जांभरून तांडा येथे पाहुण्याकडे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री नऊच्या सुमारास हिंगोली मार्गे कारने परत निघाले होते. दरम्यान, त्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये दोघात कडक्याचा वाद झाला. हाणामारी देखील झाली. हीच संधी साधून बंडू चव्हाणने जवान राजकुमार पवार यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर मृतदेह लोहगाव शिवारातील विहिरीत फेकून दिला.
वडिलांच्या फिर्यादीवरून केला गुन्हा दाखल-