हिंगोली :राज्यामध्ये एकूण 200 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या केवळ 5 जागा आणि महाविकास आघाडीच्या 12 जागा निवडून आल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संतोष बांगर हे मतदारांना मार्गदर्शन करत होते. दरम्यान त्यांनी मार्गदर्शन करत असताना कलवरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 उमेदवार आपलेच निवडून येतील. जर निवडून आले नाही, तर मी हा संतोष बांगर आपली मिशी काढेल, असे वक्तव्य केले होते. पुन्हा एक नवीन वाद ओढवून घेणारा हा आमदार संतोष बांगर यांचा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
केवळ पाच जागा :संतोष बांगर म्हणतात की, कळमनुरीमध्ये राष्ट्रवादी उरलेली शिवसेना काँगेस वंचित हे सर्व एकत्र आलेत, मात्र काहीही फरक पडणार नाही. आजही सांगतो विशेष म्हणजे या नागनाथाच्या समोर सांगतो की, कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आपल्या 17 पैकी 17 जागा निवडून येतील, अन त्या निवडुन आल्या नाही तर हा संतोष बांगर आपली मिशा काढेल, असे वक्तव्य केले होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल देखील झाला होता. मुळात बांगर म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या केवळ 5 च जागा निवडुन आल्या आहेत. त्यामुळे संतोष बांगर यांना सध्या चांगले ट्रोल केले जात आहे.