हिंगोली -अंगावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून युवकाच्या डोक्यात फावड्याचा दांडा घालून हत्त्या केल्याची घटना जिल्ह्यातील शेवाळा येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सय्यद अफसर सय्यद रसूल, असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी धाव घेतली.
हिंगोलीत अंगावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून युवकाची हत्या - खून
सय्यद अफसर सय्यद रसूल आणि ज्ञानेश्वर हरिभाऊ कुंभकर्ण हे दोघे मजूर म्हणून काम करत होते. दरम्यान अफसर याची थुंकी उडाल्याने ज्ञानेश्वर आणि अफसर या दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. त्यातून ही हत्या झाली आहे.
जिल्ह्यातील शेवाळा येथे रस्त्यावर गट्टू बसविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामावर सय्यद अफसर सय्यद रसूल आणि ज्ञानेश्वर हरिभाऊ कुंभकर्ण हे दोघे मजूर म्हणून काम करत होते. दरम्यान अफसर याची थुंकी उडाल्याने ज्ञानेश्वर आणि अफसर या दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये ज्ञानेश्वर याने हातातील फावडे अफसरच्या डोक्यात जोराने हाणले. त्यामुळे अफसर जागेवर कोसळला. त्याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अफसरचा मृत्यू झाला.
या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आरोपी ज्ञानेश्वर हा मनोरुग्ण असून त्याच्या डोक्यावर परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे , पोलीस उप निरीक्षक सविता बोधनकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.