महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तालुका निर्मितीसाठी बाळापूरकरांची शासनाला पुन्हा आर्त हाक

आखाडा बाळापूर या गावाला अनेक गावे जोडलेली आहेत. येथील आर्थिक उलाढाल लाखोंच्या घरात आहे. त्यामुळेच या गावाला तालुक्याचा दर्जा मिळवा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या समित्या झटत आहेत.

meeting-held-at-balapur-for-taluka-formation
meeting-held-at-balapur-for-taluka-formation

By

Published : Jan 6, 2020, 10:08 AM IST

हिंगोली- गेल्या अनेक वर्षांपासून तालुका निर्मितीसाठी झटणाऱ्या बाळापूरकरांच्या पदरी निराशाच येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाळापूर येथे आखाडा बाळापूर परिसर कृती समितीच्यावतीने सर्व पक्षीय बैठक पार पडली. यामध्ये माजी खासदार शिवाजी माने, आमदार संतोष बांगर यांनी बाळापूरकरांना तालुक्याचा दर्जा देण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

बाळापूरकरांची पुन्हा शासनाला आर्त हाक

हेही वाचा-'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

आखाडा बाळापूर या गावाला अनेक गावे जोडलेली आहेत. येथील आर्थिक उलाढाल लाखोंच्या घरात आहे. त्यामुळेच या गावाला तालुक्याचा दर्जा मिळवा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या समित्या झटत आहेत. जो मंत्री जिल्ह्यात येईल त्यांच्यासमोर तालुका निर्मितीचे निवेदन दिले गेले. मात्र, अश्वासनाशिवाय दुसरे काहीच बाळापूरकरांना मिळाले नाही. मात्र, समितीने अजिबात माघार घेतली नाही. पुन्हा बाळापूर येथे बाळापूर परिसर कृती समितीची बैठक पार पडली. तालुक्याचा दर्जा नसल्याने होत असलेली बाळापूरकरांची हेळसांड, नुकसान या संदर्भात मार्गदर्शन केले. 1981 पासून हा पाठपुरावा सुरू आहे. तालुका व्हावा ही मागणी गेल्या 38 वर्षांपासून लावून धरली. तसेच येथील प्रशासनामार्फत शासनाकडे महिती दिली जात असते. तरी देखील तालुका निर्मिती पुढे ढकलली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. बाळापूरला तालुक्याचा दर्जा दिल्यास खरोखरच येथील ग्रामस्थांची कायमची हेळसांड थांबण्यास मदत होईल, असे कृष्णाराव पाटील जरोडेकर यांनी सांगितले. तसेच तालुका निर्मितीसाठी वाटेल ते करण्याची तयारीही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे बाळापूरला तालुक्याचा दर्जा दिल्यास ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरिकांना सुविधा मिळण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुका निर्मितीचा प्रस्ताव यापूर्वी मांडलेला आहे. तसेच पुन्हा एकदा त्याला उजाळा देण्याचे काम मी स्वतः करणार असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आखाडा बाळापूर परिसर कृती समितीचे सदस्य, खासदार हेमंत पाटील हे देखील स्वतः हजर राहणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले. तर तालुका निर्मितीसाठी सर्वांनीच हातभार लावण्याच्या आवाहनही या बैठकीमध्ये करण्यात आले. तर कळमनुरी तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीचे तालुका निर्मितीचे प्रस्ताव बाळापूर परिसर कृती समितीकडे प्राप्त झाले आहे. आपण सर्व एकत्र येत बाळापूरला तालुक्याचा दर्जाचा देण्यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणे गरजेचे असल्याचे, माजी आमदार गजानन घुगे यांनी बैठकीत सांगितले.

तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी अपेक्षित असलेले शासकीय कार्यालय, ग्रामीण रुग्णालयासह आदी कार्यालय याठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे बाळापूरला निश्चितच तालुक्याचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तन,मन, धनाने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार घुगे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details