हिंगोली - जवळा बाजार येथे असलेल्या एका ऑइल पेंट तसेच विविध अवजारे आणि मशिनरींच्या दुकानाला गुरुवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. या आगीत, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग भीषण असल्याने लवकर आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
ऑइल पेंट, मशिनरींच्या दुकानाला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
आग विझवण्यासाठी हिंगोली येथून अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीने एवढी भीषण होती, की अग्निशमन दलाच्या टाकीतील पूर्ण पाणी संपूनही आग आटोक्यात अली नाही.
आग विझवण्यासाठी हिंगोली येथून अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आगीने एवढी भीषण होती, की अग्निशमन दलाच्या टाकीतील पूर्ण पाणी संपूनही आग आटोक्यात अली नाही. तसेच नागरिकही आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.
लक्षण विभूते असे दुकान मालकाचे नाव आहे. हे दोन मजली दुकान जिल्ह प्रसिद्ध आहे. मात्र, आग नेमकी कशाने लागली हे अद्याप कळू शकले नाही. महसूल मंडळाच्यावतीने पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दुकानात कोट्यवधी रुपयांचे साहित्य होते. नेमके किती कोटी रुपयांचे नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही.