महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 6, 2019, 8:23 PM IST

ETV Bharat / state

हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर, विक्रेत्यांना फटका

हिंगोलीतील जलेश्वर आणि सिरेहकशाह बाबा दर्गा या तलावांमधील कमळाची फुले उगवणे कमी झाले आहे. त्यामुळे एकेकाळी कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीमधून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर

हिंगोली -मागील काही वर्षांपासून हिंगोलीतील जलेश्वर आणि सिरेहकशाह बाबा दर्गा या तलावांमधील कमळाची फुले उगवणे कमी झाले आहे. त्यामुळे एकेकाळी कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीमधून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर


गौरीपुजनाच्या दिवशी कमळाच्या फुलांना प्रचंड मागणी असत. यावर्षी मात्र जलेश्वर आणि सिरेहकशाह बाबा दर्गा या तलावांमधे पुरेशी फुले उगवली नाहीत. त्यामुळे विक्रेते बाहेरून फुलांची खरेदी करून विक्री करत आहेत. शहरातील दोन्ही तलावात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच तलावाची पाणीपातळी खालावत असल्याने, कमळाची फुले उगवण्याचे प्रमाण कमी झाले. दोन वर्षांपूर्वी ही परिस्थिती उलट होती. फुलांची संख्या प्रचंड होती. दोन्ही तलावातील फुले तोडणी करण्यासाठी महसूल विभागाकडून पूर्व परवानगी आणि निवीदादेखील भरली जायची.

हेही वाचा - अमरावतीतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारला पर्यावरणपूरक गणपती


या फुल विक्रीवरच पोटाची खळगी भरणाऱ्या बऱ्याच फुल विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बदलला आहे. हिंगोलीच्या महसूल विभागाने शहराचे वैभव असलेल्या या दोन्ही तलवांचे शुद्धीकरण केले तर निश्चितच पुढच्या वर्षी कमळाच्या फुलांच्या संख्येत वाढ होईल, असे फुल विक्रते माधव करवंदे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details