हिंगोली - वसमत तालुका पाठोपाठ आता सेनगाव तालुक्यातीलही काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी गांजाची शेती केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये उघड झाले आहे. यावरुन जिल्ह्यातील इतर विभागामध्ये गांजाचा सुगंध दरवळत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक आता जिल्ह्यातील शेत शिवार पिंजून काढत आहे.
हळदीच्या पिकात गांजाची झाडे; पोलिसांना लागला सुगावा... पुढे काय घडलं वाचा
स्थानिक गुन्हे शाखेने सेनगाव तालुक्यातील वरखेडा गावात गांजाची लागवड केलेल्या शेतकऱ्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत 17 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून याची किंमत जवळपास 87 हजार इतकी आहे. मिलिंद दगड फडघन या शेतकऱ्याने हळदीच्या पिकात गांजाची झाडे लावली होती.
हळदीच्या पिकात गांजाची झाडे; पोलिसांना लागला सुगावा... पुढे काय घडलं वाचा
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार , पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, ज्ञानेश्वर सावळे, चालक संदीप खरबळ यांनी केली. या कारवाईमुळे मात्र परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -ऑक्सिजन न मिळाल्याने पती दगावल्याचा आरोप... रुग्णालयाकडून इन्कार