महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्थिक विवंचनेतून वधू पित्याची आत्महत्या.. पुढील महिन्यात होता लेकीचा विवाह - hingoli suicide

आर्थिक मंदीमुळे रोजगार नसल्याने हतबल झालेल्या वधू पित्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई पाठोपाठ वडील देखील मृत पावल्याने कु़टुंबावर शोककळा पसरली आहे. पुढील महिन्यात त्यांच्या मुलीचा विवाह होणार होता.

hingoli suicide news
आर्थिक मंदीमुळे रोजगार नसल्याने हतबल झालेल्या वधू पित्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

By

Published : Jan 29, 2020, 11:36 AM IST

हिंगोली-वाढत्या महागाईसह आर्थिक मंदीमुळे रोजगार नसल्याने हतबल झालेल्या वधू पित्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटे साडेसहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आई पाठोपाठ वडील देखील मृत पावल्याने कु़टुंबावर शोककळा पसरली आहे. पुढील महिन्यात त्यांच्या मुलीचा विवाह होणार होता. धोंडिबा राजाराम करंडे(वय-46) असे आत्महत्या करणाऱ्या वधूपित्याचे नाव आहे.

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ते मजुरी करून कुटुंबाचा उदर्निर्वाह करत होते. त्यांना एकूण चार आपत्ये असून सोळा वर्षांपूर्वी दीर्घ आजराने पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला होता. अन्य एकीचा विवाह पुढील महिन्यात होणार होता. मात्र, आर्थिक मंदीमुळे त्यांच्या कामावर गदा आली. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली.

या मुलीच्या विवाहासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details