महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या - शेतकरी

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यातच एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ती घटना विसरतो न विसरतो तोच आता फेगडे यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली.

सांकेतिक छायाचित्र

By

Published : Mar 1, 2019, 11:44 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षांपासून अल्प पर्जन्यमानामुळे शेतात काहीही उत्पन्न झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. अशातच आता पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्याने रेवूलगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संभाजी माणिकराव फेगडे (६५, रा. रेवूलगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यातच एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ती घटना विसरतो न विसरतो तोच आता फेगडे यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी हा निसर्गासमोर हथबल झाला असून क्विंटलाने होणारा शेतीमाल अल्पपर्जन्यमानामुळे किलोवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे या उत्पन्नातून भांडवली खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळेच शेतऱ्यांकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.

फेगडे यांच्यावर बँकेचे व खासगी इतर कर्ज आहे. मागील काही दिवसांपासून ते कर्ज फेडायच्या चिंतेने हैराण झाले होते. ते नेहमीच एकांतात बसत. त्यांच्या डोक्यात कर्ज फेडायचाच विचारात राहत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह वसमत येथील रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details