हिंगोली- पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने बंद पुकारण्यात आला. त्यालाच पाठिंबा म्हणून हिंगोलीतही असोसिएशनच्यावतीने बंद पुकारून डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध केला. यावेळी डॉक्टरांनी पोलीस प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन दिले. जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. मात्र, बंदचा फटका बऱ्याच रुग्णाना जाणवला आहे.
पश्चिम बंगाल डॉक्टर मारहाण प्रकरण : इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने हिंगोलीत डॉक्टरांचा संप
जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. मात्र, बंदचा फटका बऱ्याच रुग्णाना जाणवला आहे.
सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने संप पुकारल्यामुळे संपूर्ण खासगी रुग्णालय बंद होते, तर डॉक्टरांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दिवसभर खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा यावेळी आधार घ्यावा लागला.
सोमवारी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही खासगी डॉक्टर सेवा देणार नसल्याचे असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, अत्यावश्यक सुविधा आणि आपत्कालीन सेवा या काळात सुरूच ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.