हिंगोली- जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील विविध भागात १२५ परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. काल (मंगळवारी) प्रशासनाच्या पुढाकाराने सर्व मजुरांना 'लालपरी'ने स्वगृही पोहोचविण्यात आले. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने मजुरांनी प्रशासनासह आमदारांचे आभारही मानले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनाच फटका बसला आहे. त्यातच कामकाजही बंद झाल्याने वसमत तालुक्यातील विविध भागात हातावर पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. अनेक दानशुरांनी पुढे येत या मजुरांना मदत कली. मात्र मजूर स्वगृही जाण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे, त्यांना स्वगृही पोहोचवण्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून काल (मंगळवारी) वसमत येथून १२५ मजुरांना बसेसने मध्येप्रदेशची सीमा असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कडकी येथील चेक पॉईंटवर सोडण्यात आले. मजुरांना स्वगृही पोहोचविण्यासाठी आगार प्रमुख मुपडे यांनी ५ विशेष बस उपलब्ध करून दिल्या होत्या.