हिंगोली - कोरोनामुळे सर्वच परिस्थिती विदारक बनत चालली आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरात बसले आहेत. दुकानेदेखील बंद असल्याने हिंगोलीत मोकाट गुरांची चाऱ्यासाठी मोठी पंचायत निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांतील माणुसकी जागी झाली अन् त्यानी भुकेने सैरा-वैरा भटकत असलेल्या गुरांची भूक क्षमवली. खर तर यासाठी अनेक संस्था किंवा दानशुरानी पुढे येण्याची आज खरी गरज आहे.
Lockdown : ..अन् हिंगोलीत 'वर्दी'तली माणुसकी झाली जागी; मोकाट गुरांची भूक क्षमवली
लॉकडाऊनमुळे सर्वच परिस्थिती विदारक बनत चालली आहे. मोकाट गुरांच्या चाऱ्याची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांतील माणुसकी जागी झाली अन त्यानी चारा खरेदी करून भुकेने सैरा-वैरा भटकत असलेल्या गुरांची भूक क्षमवली.
रस्त्यावर ये-जा करणारे नागरिक पाहून गुरे त्यांच्याकडे बघून हंबरडा फोडत असल्याचे दिसताच रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यातील माणुसकी जागी झाली. लागलीच वाहतूक शाखेचे सपोनि ओंमकांत चिंचोळकर व अन्य कर्मचाऱ्यांनी हिंगोली शहरात चारा विक्रीसाठी आलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीकडून सर्वच चारा विकत घेतला व मोकाट जनावरांना पुरवला.
कधी नव्हे ते एक ठोक गिऱ्हाईक चालून आल्याने त्याच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पहावयास मिळाले. अन पोलीस वाहनात टाकून शहरभर फिरुन जेथे मोकाट गुरे दिसतील तिथे चारा टाकून त्यांची भूक शमवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलाय. खरंतर कोरोना सारख्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये गुरांची भूक शमविण्यासाठी अनेक सामाजिक, धार्मिक संघटनेसह नागरिकांनीही पुढे येण्याची नितांत गरज आहे. वाहतूक शाखेने आज गुरांची भूक भागवून कर्तव्य बजावल्याचे हिंगोलीकरांना पाहावयास मिळाले.