महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 2, 2019, 7:48 PM IST

ETV Bharat / state

हेल्मेट घालणाऱ्यांचा वाहतूक पोलिसांकडून सत्कार, न घालणाऱ्यांना हात जोडून विनंती

जे दुचाकीस्वार हेल्मेट घालून प्रवास करीत आहेत, अशा प्रवाशांचा वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला जात आहे, तर जे विना हेल्मेट प्रवास करीत आहेत, अशांना हेल्मेट वापरण्यासाठी हात जोडून विनंती केली जात आहे.

हेल्मेट घालणाऱयांचा वाहतूक पोलिसांकडून सत्कार
हेल्मेट घालणाऱयांचा वाहतूक पोलिसांकडून सत्कार

हिंगोली- शहरात 1 डिसेंबरपासून दुचाकीस्वरांसाठी हेल्मेट सक्ती केली गेली आहे. जे दुचाकीस्वार हेल्मेट घालून प्रवास करीत आहेत, अशांचे वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला जात आहे, तर जे विना हेल्मेट प्रवास करीत आहेत, अशांना हेल्मेट वापरण्यासाठी हात जोडून विनंती केली जात आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक ओंकांर चिंचोळकर हेल्मेट न वापरण्याचे दुष्परिणाम दुचाकीस्वारांना सांगत आहेत. जिल्ह्यात वाहतूक शाखेच्यावतीने वाहन चालकांना शिस्त लावण्याचा अतोनात प्रयत्न केला जात आहे.

पार्किंगच्या संदर्भात तर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना अनेक वाहनधारकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागते. तरीदेखील वाहतूक शाखेचे कर्मचारी मागे हटले नाहीत. त्यामुळेच कुठे हिंगोली शहरातील अतिवर्दळीचा असलेल्या जवाहर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. त्यातच वाहनधारकांची होणारी गैरसोय पाहून पालिका देखील धावून आली. गांधी चौक येथे सुरू असलेले नगरपालिकेचे शौचालय तोडून त्याठिकाणी वाहनतळ करण्यास सुरुवात केली गेली.

हिंगोलीत हेल्मेट न घालणाऱ्यांना हात जोडून विनंती

याच कारणामुळे भविष्यात वाहनतळाची समस्या सुटण्यास मदत होऊन, हेल्मेटच्या वापरामुळे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच वाहतूक शाखेच्यावतीने सर्वप्रथम पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली, तर पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या कोणत्याही दुचाकी चालकांना, विना हेल्मेट अजिबात जाऊ दिले जात नसल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details