महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सलग दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेने लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त - lokcdwon

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयंकर परिस्थितीत अनेकांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण होऊन बसले आहे. याकाळातही गुटखा माफिया गुटख्याची सवय जडलेल्यांसाठी जीवाची बाजी लावून गुटख्याची विक्री करीत आहेत.

सलग दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेने लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त

By

Published : Apr 10, 2020, 10:25 AM IST

हिंगोली-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात थैमान घातलाय. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यातही सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात असताना ही गुटखा माफिया सक्रिय झाले आहेत. पिंपरी येथे स्थानिक गुन्हे शाखेने एका दुकानावर मारलेल्या छाप्यात 1 लाख 21 हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेने लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र,एवढ्या भयंकर परिस्थितीत अनेकांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण होऊन बसले आहे. याकाळातही गुटखा माफिया गुटख्याची सवय जडलेल्यांसाठी जीवाची बाजी लावून गुटख्याची विक्री करीत आहेत.

बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या पिंपरी बु येथे एका दुकानावर गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, संभाजी लेकुळे, बालाजी बोके, न्यानेश्वर सावळे यांच्या पथकाने पिंपरी बु येथे माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारला असता 1 लाख 21 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला.

कडक पोलीस बंदोबस्त मध्ये ही एवढा मोठा गुटखा पोहोचला कसा ? हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. तसेच कोरोना संकटात अवैध धंदे चालक मात्र पोलिसांना एक प्रकारे आव्हान देत असल्याचे दिसते.

ABOUT THE AUTHOR

...view details