हिंगोली - इदगाह मैदान येथे ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे नमाज पठण सुरू होते त्याच दिवशी या रस्त्यावरून कावड यात्रा निघाली होती. नमाज पठण सुरू असताना वाहतुकीला परवानगी दिल्याने गोंधळ उडाला होता. यासाठी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंगोलीतील मुस्लिम बांधवांनी केली आहे.
हिंगोलीत इदगा मैदान येथे ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे नमाज पठन सुरू होते त्याच दिवशी या रस्त्यावरून कावड यात्रा निघाली होती. यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला, पोलिसांकडूनच चुकीच्या पद्धतीने वातावरण बिघडण्यात आले, असा आरोप करत नमाज अदा सुरू असताना वाहतुकीला परवानगी दिल्याने गोंधळ उडाल. यासाठी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंगोलीतील मुस्लिम बांधवांनी केली आहे.
दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन पत्राद्वारे मुस्लिम बांधवाने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कारवाई न झाल्यास 20 ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे आता प्रकरण निवळले असले तरी टीकेचे धनी हे पोलीस प्रशासनच ठरताना दिसत आहे.