हिंगोली - गांधी चौक येथे गेल्या नऊ दिवसांपासून मुस्लिम बांधवांचा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू. मात्र, प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आंदोलनात सहभागी असलेल्या काही मुस्लिम बांधवांनी अंगावर तिरंगा काढून त्यावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणारे लिखाण करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंगोलीत मुस्लिम बांधव सीएए विरुद्ध आक्रमक; अंगावर तिरंगा काढून सरकारविरुद्ध घोषणाबाजी - नागरिकत्व सुधारणा कायदा हिंगोली आंदोलन
संपूर्ण राज्यात काही ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे तर काही ठिकाणी समर्थन केले जात आहे.
हिंगोलीत मुस्लिम बांधव सीएए विरुद्ध आक्रमक
हेही वाचा - साई जन्मस्थान वाद: शिर्डी, पाथरी नाही तर 'या' ठिकाणी साईबाबा सर्वप्रथम दिसले
संपूर्ण राज्यात काही ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे तर काही ठिकाणी समर्थन केले जात आहे. आंदोलनकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात आहेत. मात्र, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याचे दिसून येत आहे.