महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात हिंगोलीत चोरी-छुपे दारू विक्री.. एलसीबीची छापेमारी, 24 तासात 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - हिंगोली लॉकडाऊन

लॉकडाऊन काळात चोरी छुपे दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात विविध ठिकाणी छापे टाकून 2 लाख 6 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कारवाईने चोरून दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

hingoli Local crime branch raids on Illegal liquor sales
लॉकडाऊन काळात हिंगोलीत चोरी-छुपे दारू विक्री

By

Published : May 18, 2020, 12:41 PM IST

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पन्नास दिवसापासून बंद करण्यात आलेली दारू विक्री एक दिवस आड सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढूनही चोरीच्या मार्गाने दारू विक्री केली जात होती. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात विविध ठिकाणी छापे टाकून 2 लाख 6 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने चोरून दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

लॉकडाऊन काळात हिंगोलीत चोरी-छुपे दारू विक्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीची बंद असलेली दारू दुकाने शासनाने नियमाचे पालन करून उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने एक दिवस आड सुरू केली आहेत. त्या ठिकाणी शिस्तीत दारू देखील खरेदी करण्यासाठी मद्यप्रेमी पहाटे पासून रांगेत जागा धरून उभे राहत आहेत. मात्र ग्रामीण भागात चोरी छुपे दारू विक्री करणाऱ्यांचा उद्देश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामुळे फसला आहे.जिल्ह्यात या ठिकाणी मारण्यात आले छापे -हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मारलेल्या छाप्यात लक्ष्मण नारायण अरे विरुद्ध कारवाई करून एक दुचाकी व देशी दारूचे दोन बॉक्स असा 37 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या जुणोना गावात मारलेल्या देशी दारूच्या 3 हजार 660 रुपयांच्या 60 बाटल्या जप्त करून सखाराम उत्तम गायकवाड, विठ्ठल उर्फ भुरू मामा पोटे (रा. शिरळी), व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पिंपराळा शिवारात मारल्याचा त्यात एक दुचाकी व देशी दारूचे दोन बॉक्स असा 40 हजाराचा मुद्देमाल अन अक्षय राजू आझादे, संघपाल विजय खंदारे, (रा. चोंढी रेल्वे स्टेशन चंदू अण्णा स्वामी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील डिग्रस पाटी येथे मारलेल्या छाप्यात एक दुचाकी तर 11 हजार 200 रुपयांच्या 140 देशी दारूच्या बाटल्या, असा एकूण41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डीग्रस कराळे येथे मारलेल्या छाप्यात ३० हजार रुपये किमतीची स्कुटी व 1 हजार 840 रु देशी दारूच्या 23 बॉटल तर 2 हजार 240 नगदी असा 34 हजार 80 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला . हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या हॉटेल रूद्राक्ष वर मारलेल्या छाप्यात 40 हजार रुपये किंमतीची एक स्कुटी, अन काउंटरवर 4 हजार 240 रुपयांच्या 53 देशी दारूच्या बॉटल व 950 रुपये नगदी असा 45 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details