हिंगोली - रब्बी हंगामातील पीक हाता तोंडाशी आले आहे. तर दिवसरात्र एक करीत हळद उत्पादक शेतकरी हळद वेचून घेत कुकर मधून शिजवून घेण्यासाठी धडपड करीत आहेत. तर काही भागात गहू काढणी देखील जोरात सुरू आहे. अन अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावलेल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
ढगाळ वातावरण असल्याने आरोग्यावर देखील परिणाम-
हिंगोली जिल्ह्यात सध्या रब्बीचा हंगाम हा जोरात सुरू आहे. शेतकरी गहू तसेच रब्बी पीक काढून घेण्यामध्ये मग्न आहेत, तर नगदी पीक म्हणवल्या जाणाऱ्या हळदीची देखील काढणे मोठ्या लगबगीने सुरू आहे अशाच परिस्थितीमध्ये हजेरी लावलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले दोन दिवसापासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्याने त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. तर रात्री-अपरात्री शेतकरी हळद शिजवून घेण्यामध्ये मग्न आहेत. मात्र बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आज रात्री आठच्या सुमारास झालेल्या पावसाने तर शेतकऱ्यांची एवढी तारांबळ उडाली होती. की शेतात उघडी ठेवलेली हळद तसेच हळदीचे बेणे झाकून ठेवण्यासाठी शेतकरी धाव घेत होते.
हळद शिजवनी कुकर चे वाढले भाव-