महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात पहिला, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक - हिंगोली कोरोना आकडेवारी

हिंगोली जिल्हा कोरोना विषाणूजन्य आजाराच्या रिकव्हरी रेटमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. शिवाय हिंगोली जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 0.3 एवढे आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत दुप्पट वाढ होण्याचे प्रमाण 42 दिवसानंतरचे आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी दिवस-रात्र झगडणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अभिनंदन केले आहे.

हिंगोली जिल्ह्याचा कोरणा रुग्ण बरे होण्यामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर
हिंगोली जिल्ह्याचा कोरणा रुग्ण बरे होण्यामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर

By

Published : Jul 8, 2020, 7:13 PM IST

हिंगोली : जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्याच अनुषंगाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये बाधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 0. 3 एवढे असून, रुग्ण बरे होण्यामध्ये हिंगोली जिल्ह्याने 'रिकव्हरी रेट'नुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे हिंगोली प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये राज्यातून तसेच परराज्यातून याचबरोबर विविध ॲट्रॉसिटीतून 14 मार्चपासून आजतागायत 47 हजार 766 नागरिक आलेले आहेत. या सर्व नागरिकांची वैद्यकीय अधिकारी तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये कोरोना आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर संबंधिताला शासकीय क्वारंटाईन करून त्या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब घेत नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात येत होते. तर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिप मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी जिल्ह्यातील गावोगाव जाऊन कोरोनापासून वाचण्या संदर्भात जनजागृती केली.

आजरोजी 297 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, 252 रुग्ण हे बरे झाले आहेत. तर, 45 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर, तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे येथील आरोग्य सेवा संचालकांच्या अहवालानुसार हिंगोली जिल्हा कोरोना विषाणूजन्य आजाराच्या रिकव्हरी रेटमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. शिवाय मृत्यूचा दर पाहता हिंगोली जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 0.3 एवढे आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत दुप्पट वाढ होण्याचे प्रमाण 42 दिवसानंतरचे आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी दिवस-रात्र झगडणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अभिनंदन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details