हिंगोली - जिह्यात जालना येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात असून तो पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. जिल्ह्याला एकमेव पुरवठादार असून दिवसाकाठी जिल्ह्याला सहा सिलिंडर तीन ट्रकच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. सद्यघडीला कळमनुरी वसमत, ओंढा नागनाथ आणि सेनगाव येथे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. पुढील काळात वसमत येथे देखील ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
हिंगोली जिह्याला जालना येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात असून तो पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. मात्र प्रशासन पूर्णपणे कोरोनाला हटविण्यासाठी सज्ज असून कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवण्यासाठी फार बारकाईने नियोजन केले जात आहे. जालना येथील एफुम गॅसेस लिमिटेड या कंपनीला ऑक्सिजन पुरवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. सद्याच्या परिस्थितीत हा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिली.
दिवसाकाठी 800 लीटर ऑक्सिजन लागतो. तर हिंगोली येथे सहा ड्युरा सिलेंडर उपलब्ध असून, त्यामधून एका वेळेस 26 सिलेंडर भरले जाऊ शकतात. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय थांबली आहे. तीन टँकर मधून सिलिंडर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एका टँकरमध्ये तीन सिलिंडरची वाहतूक केली जाते.
हिंगोलीसह कोरोना वार्ड असलेल्या ठिकाणी चार जम्बो सिलिंडरची उभारणी केली असून, याच्या जोडणीचे देखील काम जलद गतीने सुरू आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल. टॅंक उभारणीचे ज्या कंपनीला काम दिले आहे, त्या कंपनीकडून वारंवार अपडेट मागितली जात असल्याचे, जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.