हिंगोली- जीवाची जराही परवा न करता या महा भयंकर कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हिंगोली शहरातील लाला लजपतराय चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुष्पवृष्टी मुळे नक्कीच या कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळण्यास मदत होणार आहे.
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हिंगोलीकरांनी केली पुष्पवृष्टी - अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हिंगोलीकरांनी केली पुष्पवृष्टी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणारे डॉक्टर,सफाई कामगार, पोलीस प्रशासन,वीज कर्मचारी, यासह दूधवाले आणि पत्रकार आपला जीव मुठीत धरुन अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. या सर्वांचा सन्मान हिंगोलीकरांनी केला.
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हिंगोलीकरांनी केली पुष्पवृष्टी
नगरपालिकेचे सफाई कामगार आपला जीव धोक्यात टाकून शहरात साफसफाई व स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी हिंगोलीकरानी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि टाळ्या वाजवून सन्मान केला. अचानक झालेल्या या सन्मानाने अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी भारावून गेले.
Last Updated : Apr 11, 2020, 5:08 PM IST