हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर राज्यात अन परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांची फार आबाळ होत आहे. काही जण तर जीवांची जराही पर्वा न करता डोक्यावर मोठे ओझे, हातात लहान लहान चिमुकले घेऊन रात्री अपरात्री अनेक किलोमीटर अंतर कापत आहेत. मात्र, आता ही जीवाची बाजी लावण्याची अजिबात गरज नाही. परजिल्ह्यात अडकून पडलेल्या व्यक्तीसाठी प्रशासन धावून जाणार आहे. मात्र त्यांना काही अटींसह घरी परतता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
संपूर्ण जगात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत पर राज्यासह पर जिल्ह्यात अनेकजण अडकून पडलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक मजुरांचा अन विध्यार्थ्यांचा समावेश आहे. आता त्यांच्यासाठी हिंगोलीचे प्रशासन आता धावून जाणार आहे. मात्र त्यांना काही अटी घालून दिल्या आहेत. निदान प्रशासनाच्या या पुढाकाराने अनेकांची पायपीट थांबण्यास मदत होणार आहे.
अशा आहेत अटी -
इतर जिल्ह्यात अडकून पडलेल्यांसाठी हिंगोली प्रशासन जाणार धावून, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश - हिंगोली स्थलांतरीत मजूर
कॅम्पमध्ये असलेले मजूर ज्या राज्यातील आहेत, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना यादीसह संपर्क साधून त्यांची सहमती घ्यावी लागणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सहमती मिळताच या मजुरांना वाहनांद्वारे त्यांच्या मूळ निवासस्थानी पास देऊन पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
कॅम्पमध्ये असलेले मजूर ज्या राज्यातील आहेत, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना यादीसह संपर्क साधून त्यांची सहमती घ्यावी लागणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सहमती मिळताच या मजुरांना वाहनांद्वारे त्यांच्या मुळ निवासस्थांनी पास देऊन पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त इतर राज्यातील अथवा जिल्ह्यातील व्यक्ती हिंगोली जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व ते त्यांच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी जाऊ इच्छित असतील, अशा व्यक्तीने प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावाची यादी तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करून हिंगोली जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या ई-मेल आयडी sdohingoli123@gmail.com, किंवा sdokalmnuri@gmail.com,sdobasamat@gmail.com, वर अर्ज पाठवावेत.
प्रवास करण्यापूर्वी परजिल्ह्यात जाणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घेणे संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून, सहमती प्राप्त करणे, इत्यादी बाबी झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी हिंगोली यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ज्या व्यक्ती अन्य राज्यात किंवा जिल्ह्यात अडकून पडल्या असतील अशा व्यक्तीने सध्या स्थितीत वास्तव्यास असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचेकडून वाहतूक परवानगी प्राप्त करून घेऊन त्याची प्रत कार्यालयाच्या ईमेल आयडी rdc.hingoli123@gmail. com वर कळवावी.
परत राज्य तसेच पर जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात परतलेल्या सदरील व्यक्तींनी आपल्याजवळील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे किंवा 14 दिवस अलगीकरण लक्षात राहणे बंधनकारक राहणार आल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.