हिंगोली- जिल्ह्यातील काही भागात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. याशिवाय जिल्ह्यातील रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
हिंगोलीत अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे अतोनात नुकसान - रब्बी पिकांचे अतोनात नुकसान
जिल्ह्यातील काही भागात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
हिंगोलीत अवकाळी पावसाची हजेरी
अचानक आलेल्या या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला आहे. कधी बाजारभाव तर कधी नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा पुर्णतः हतबल झाला आहे. या पावसाने झालेल्या नुकसानामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे.