महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत जोरदार पाऊस; बळीराजाला मोठा दिलासा - पाऊस बातमी

जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसापासून पाऊस अधून-मधून जोरदार हजेरी लावत आहे. कालही दिवसभर ढगाळ वातावरण होते. दहा ते पंधरा मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पुन्हा पाणी साचले होते.

हिंगोलीत जोरदार पाऊस

By

Published : Sep 24, 2019, 10:51 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात खरीप हंगाम हातातोंडाशी आलाय. त्यामुळे आता जेवढा पाऊस पडेल तेवढा बळीराजासाठी उपयोगाचाच आहे. आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते.

हिंगोलीत जोरदार पाऊस

हेही वाचा-आता चर्चेची नाही तर कृतीची गरज, भारतात जलजीवन मिशनची सुरुवात - पंतप्रधान मोदी

जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसापासून पाऊस अधून-मधून जोरदार हजेरी लावत आहे. कालही दिवसभर ढगाळ वातावरण होते. दहा ते पंधरा मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पुन्हा पाणी साचले होते. आज झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून नदी नाले देखील दुथडी भरुन वाहत होते. सध्या सोयाबीनचे पीक जोमात असून, सोयाबीनला शेंगा लागल्या आहेत. पाऊस दिलासा देत असल्याने, यंदा उत्पन्नात बऱ्या पैकी वाढ होण्याची शक्यता आहेत.

हेही वाचा-जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत

पावसाने खोलगट भागातील जमीनीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. शिवाय, पावसाचा जोर कायम असल्याने या वर्षी रब्बीच्या पिकालाही दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या वर्षी दोन्ही हंगामातील पिके शेतकऱ्यांना घेता येणार आहेत. विशेष जिल्ह्यात विविध भागात जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी साठवून राहण्यास मदत होत आहे. तर नदी नाल्याच्या वाहत्या पाण्यामुळे विहीर, बोअरची सध्या तरी पाणीपातळी स्थिर आहे. याचा भविष्यात उत्कृष्ट रित्या उपयोग होण्यासाठी मदत होईल. आज सायंकाळी झालेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

ABOUT THE AUTHOR

...view details