हिंगोली -जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास नऊ तास झालेल्या पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हा पूर्णपणे हिरावून घेतला आहे. अशीच एक झाकून ठेवलेली सोयाबीनची सुडी पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून एका मच्छीमार ती सुडी पकडण्यासाठी जीवाची जराही पर्वा न करता होडीच्या साह्याने सुडीचा पाठलाग करीत होता. मात्र त्याला ग्रामस्थांनी पुलावर पकडून त्याचा जीव वाचविला. हा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोयाबीनची वाहून जाणारी सुडी पकडण्यासाठी मच्छिमाराचा होडीने चित्तथरारक पाठलाग, पाहा व्हिडिओ - वाहून जाणारे सोयाबीन पकडण्यासाठी होडीने प्रवास
सोयाबीनची सुडी पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून एका मच्छीमार ती सुडी पकडण्यासाठी जीवाची जराही पर्वा न करता होडीच्या साह्याने सुडीचा पाठलाग करीत होता. मात्र त्याला ग्रामस्थांनी पुलावर पकडून त्याचा जीव वाचविला. हा ह्रदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हे ही वाचा -Health Department Exam : परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र.. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
शेतकऱ्याने घेतला सुटकेचा श्वास -
डोंगरकडा येथील पवन दारव्हेकर यांची ती दोन एकर मधील कापून टाकलेली सोयाबीनची सुडी होती, तर एक दोन दिवसात मळणी यंत्रातून सोयाबीन काढण्यात येणार होते, मात्र शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे सुडी वाहुन गेली अशातच मच्छिमार पावडे यांनी जीवाची बाजी लावून सुडी वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. मात्र त्यांना शक्य झाले नाही ते नेहमीच कुणाच्या ही मदतीसाठी धावून येतात, मात्र ही घटना फार धोकादायक होती. ते आमची सुडी वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्याची माहिती मिळताच आमचेच ह्रदयाचे ठोके वाढले होते, मात्र ते जेव्हा पाण्याबाहेर सुखरूप निघाले तेव्हा कुठे आम्हाला समाधान वाटल्याचे शेतकरी पवन दारव्हेकर यांनी सांगितले.