हिंगोली- पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिप पिके हातातून जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, आज (रविवारी) झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन तीन दिवसांपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातवरण होते. तसेच काही ठिकाणी पाऊसही पडला होता. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणी पाणी करून टाकले.
हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकऱ्यांना दिलासा - हिंगोली पाऊस
आज (रविवारी) झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. खरिप पिके धोक्याच्या आली आहेत.
पोळ्याच्या दिवशी अन् करीच्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. आज, झालेला पावसाने खरिपाची पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून यापैकी २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रावरही पेरणी झाली आहे. बऱ्याच काळापासून पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपारच्या वेळी माना टाकीत होते. माळरान जमीनीवरील पिके तर हातची जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, दोन ते तीन दिवसापासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने, शेतऱ्यांना दिलाचा मिळाला होता. मात्र, आज जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दुर झाली आहे.
पहाटे ४ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. एरवी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. मात्र, पावसामुळे अनेकांनी घराबाहेर येणे टाळले. गणोशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे सगळ्यांना दिलास मिळाला आहे