हिंगोली- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर पालकमंत्री सावे यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण - hingoli
स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण करताना पालकमंत्री
त्यानंतर ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांची सावे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी आपापल्या अडचणी पालकमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर पालकमंत्री संबंधित विभागाकडे चौकशी करण्याच्या सूचना देत होते.
Last Updated : Aug 16, 2019, 10:21 AM IST