महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तू माझ्यावर प्रेम करतेस का? असे विचारत त्याने तिला डांबलं स्वच्छतागृहात; अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पीडिता शुक्रवारी दुपारी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन्ही आरोपींनी पीडितेचा रस्ता अडवला. त्यांना ढकलून पीडिता पळत सुटली. मात्र, तिला पुन्हा गाठत एका स्वच्छतागृहात डांबले. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने प्रेमाची कबुली दे, असा तगादा लावला.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 22, 2019, 5:08 PM IST

Updated : Jun 22, 2019, 6:00 PM IST

हिंगोली - 'तू माझ्यावर प्रेम करतेस का? माझ्या प्रेमाची कबुली दे' असे म्हणत एका प्रमेविराने तरुणीला स्वच्छतागृहात डांबले. कबुली देत नाही तोपर्यंत बाहेर काढणार नसल्याची धमकी त्याने दिली. जिल्ह्यातील दाताडा बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कुंडलिक माने (वय १८) असे आरोपीची नाव असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. पीडिता शुक्रवारी दुपारी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी जात होती. त्यावेळी दोन्ही आरोपींनी पीडितेचा रस्ता अडवला. त्यांना ढकलून पीडिता पळत सुटली. मात्र, तिला पुन्हा गाठत एका स्वच्छतागृहात डांबले. त्यानंतर अल्पवयीन आरोपीने माझ्या प्रेमाची कबुली दे, असा तगादा लावला. पीडिता ओरडायला लागल्याने तिच्या भावाला मारण्याच्या धमक्याही दिल्या. त्यामुळे ती पूर्णपणे घाबरली होती. हा सर्व प्रकार तब्बल ३ तास चालत होता.

घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

विनवण्या करूनही आरोपींकडून सुटका होत नव्हती. त्यामुळे पीडिता जोरजोरात ओरडत होती. तिचा आवाज मामाच्या कानी पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बघताच आरोपींनी घटनास्थळावरून धुम ठोकली. त्यानंतर पीडितेच मामाने सुटका केली. त्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून दोन्ही आरोपींविरोधात विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक ए. जी. खान करीत असून आरोपीला तत्काळ अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपासून एकतर्फी प्रेमाच्या घटनामध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळ बुद्रुक येथे 'तू तो मेरी जान है' असे म्हणत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालय परिसरात दामिनी पथक, चिडीमार पथक तैनात करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थिनींकडून होत आहे.

Last Updated : Jun 22, 2019, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details