महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस सिलिंडरची गळती होऊन घराला आग.. जीवाची बाजी लावून तरुणाने वाचविला कुटुंबाचा प्राण - हिंगोलीत गॅस सिलिंडरची गळती

कळमनुरी येथे गॅस सिलिंडरची गळती होऊन घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. मात्र एवढ्या भयंकर आगीत सापडलेले कुटुंब एकाने जीवाची बाजी लावून वाचवल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलीय. यामध्ये पाच जण गंभीर भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gas cylinder leaks and fire breaks out house
Gas cylinder leaks and fire breaks out house

By

Published : Apr 4, 2021, 5:26 PM IST

Updated : Apr 4, 2021, 6:37 PM IST

हिंगोली - कळमनुरी येथे गॅस सिलिंडरची गळती होऊन घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. मात्र एवढ्या भयंकर आगीत सापडलेले कुटुंब एकाने जीवाची बाजी लावून वाचवल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलीय. यामध्ये पाच जण गंभीर भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र युवकाने दाखविलेल्या या तत्परतेने चापके कुटुंबाचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

शेख मिराज असं या धाडसी युवकाचे नाव आहे. तर वैष्णवी रामभाऊ चापटे (१४), संगीता रामभाऊ चापटे (३४), प्रणव रामभाऊ चापटे (१५), रामभाऊ शंकर चापटे (५०) अशी जखमींची नावे आहेत. चापटे कुटुंब हे दुपारच्या वेळी स्वयंपाक करीत असताना अचानक गॅस गळती सुरू झाली. काही कळण्याच्या आत गॅसने पेट घेतला. घरच्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र, काही केल्या आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. आगीचे लोळ हे वाढतच गेले. दरम्यान, युवक शेख मिराज, अकलम सिद्दीकी, अक्षय ढगे, फारुख पठाण, अय्याज नाईक व उत्तम शिंदे, शिवराज पाटील यांनी घरात धाव घेऊन घरातील मंडळींना बाहेर काढले.

गॅस सिलिंडरची गळती होऊन घराला आग
आगीत घर जळून खाक -
आगीत घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून भांडे, कपडे लत्ते आदी साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला असून, या प्रकरणी नोंद केली आहे.
नांदेड येथे केले जखमींना दाखल-
चापके कुटुंबातील अनेक जण खूप गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी ताबडतोब शासकीय रुग्णालयात हलविले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर केले आहे. यामध्ये जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती पोनी रंजित भोईटे यांनी दिली.
आमदार संतोष बांगर यांनी घेतली जखमीची भेट -
नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली तसेच घटनास्थळी देखील धाव घेत संबंधित यंत्रणेला पंचनामा करून लाभ देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Last Updated : Apr 4, 2021, 6:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details