महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरफोड्या करणारी टोळी गजाआड, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त - हिंगोली पोलीस

गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात घऱफोड्या करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका हॉटेल मॅनेजरचा देखील समावेश आहे. चोरट्यांकडून 10 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

hingoli crime news
दरोडेखोरांच्या टोळीला अटक

By

Published : Oct 23, 2020, 7:33 PM IST

हिंगोली - गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, या टोळीत एका हॉटेल मॅनेजरचा देखील समावेश आहे. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दित येणाऱ्या वरुड तांडा येथे चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले, चौकशीदरम्यान त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 10 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोविंद सूर्यवंशी, संतोष पुणवेकर, राहुल खांनजोडे, अनिल भोसले, राजू भोसले, शंकर ऊर्फ टिल्या भोसले, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी वरुड तांडा चोरीप्रकरणात त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी आतापर्यंत चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details