हिंगोली- आखाडा बाळापूर येथून हदगावमार्गे जाणाऱ्या बसवर कळमनुरी तालुक्यातील देवजना शिवारात चार जणांने दगडफेक केली. त्यानंतर ती बस पेटवून देण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हदगाव आगारची बस बाळापूर येथे नियमित दोन फेऱ्या करते. तर बस मुक्कामी हदगाव येथे जाते. नेहमी प्रमाणे हदगाव आगाराची बस (एम. एच. 40 एन 9801) बाळापूरहून हदगावमार्गे 14 प्रवासी घेऊन निघाली होती. बस शेवाळा फाट्यापासून देवजना शिवारात पोहोचली. त्यावेळी बस समोर अचानक चार तरुण आले. ते रस्त्याच्या मधोमध थांबल्याने बस चालकाने बस थांबली. तर त्या चार जणांनी बस मधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यामुळे प्रकाराने प्रवासी काहीकाळ गोंधळले.