महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रक जीपचा भीषण अपघात सात जखमी, चार गंभीर

कनेरगाव या राज्य रस्त्यावरील वडद फाट्यावर जीप आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

By

Published : May 19, 2019, 2:56 PM IST

अपघातग्रस्त वाहन

हिंगोली- कनेरगाव या राज्य रस्त्यावरील वडद फाट्यावर जीप आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ११ वाजण्यच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये जखमींना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. ही वऱ्हाडी मंडळी वाशिमहून हिंगोली जिल्ह्यातील समगा येथे विवाह समारंभासाठी जात होती.

माहिती देताना डॉक्टर


जखमी मध्ये जोताबाई शामराव घायाळ(वय ४० वर्षे, रा. वाशिम), किरण गंगाधर पातळे (वय १० वर्षे, रा. मांगुळ जनक), भागुबाई राजू डाळ (वय ३५ वर्षे, रा. वाशिम), प्रल्हाद नारायण डाळ (वय ३० वर्षे रा. वाशिम), राजू नामदेव डाळ (वय ५० वर्षे), मंदाबाई सुभाष डाळ (वय ३५ वर्षे), बजरंग राजू डाळ (वय १३ वर्षे) यांचा समावेश आहे. हे सर्वजण जीपने (क्र एम 37 जी 3511) हिंगोलीकडे येत होते. दरम्यान, ट्रकची (क्र एम पी 09 जी एच 3948) समोरा- समोर जोराची धडक झाली. यामध्ये जीपमधील सात जखमी झाले आहेत. घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. बोलेरो गाडी पुर्णतः चेंदामेंदा झाल्याने जखमींना गाडीचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावरून खासगी रुग्णवाहिकेने जिल्हा शासकिय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉ. स्वाती गुंडेकर, डॉ. अजय शिराडकर आणि परिचारिकांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठले आहे. मात्र, जखमीच्या नातेवाईकांनी नांदेड ऐवजी वाशिमलाच जाणे पसंत केले.


अपघातात नेहीच धावून जाणारी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका ना घटनास्थळी आली ना रुग्णालयातून रुग्ण वाशिमला हलविताना आली. त्यामुळे जखमी रुग्णांना खासगी वाहनानेच पुढील उपचारासाठी हलविले जात होते. तर दुसरीकडे समगा या गावी वऱ्हाडी मंडळीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली.
याप्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या अपघाताच्यामाध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ दिसून आले. जखमींवर उपचार करताना नातेवाईकांच्या हातात सलाईन दिसत होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details