हिंगोली- जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकाराने औंढा नागनाथ येथे खळबळ उडाली असून, एटीएस पथकाने याची गंभीर दखल घेतली. राहूल तायडे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीत किरकोळ कारणावरुन गोळीबार; काडतुसे जप्त
अजूनही औंढा नागनाथ येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
शाम कदम, गुड्डू बांगर, संतोष गोरे, स्कॉरपीओचा चालक गुलशन असे आरोपीची नावे आहेत. आरोपी (एमएच.12 एनई 4111) क्रमांकाच्या वाहनाने ओंढा नागनाथ येथील हिंगोली- ओंढा रोडवरील सलीम नुरोदिन इनामदार यांच्या किराणा दुकानासमोर बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगताना आढळून आले. यातून लोखंडी धारदार कता, दोन लोखंडी पाईप, एक जिवंत काडतुस जप्त केले. त्यामनंतर आरोपी सदर वाहनाने पळूनही गेले. नेमके भांडणाचे कारण काय अजून स्पष्ट झाले नाही.
अजूनही औंढा नागनाथ येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांच्या मंडळींनीदेखील यात हस्तक्षेप करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.