महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना: शेतकऱ्यांना बांधावरच मिळणार खतं आणि बी बियाणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खते आणि बियाणांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 200 शेतकरी गटामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

hingoli
शेतकऱ्यांना बांधावरच मिळणार खतं आणि बी बियाणे

By

Published : May 9, 2020, 6:51 PM IST

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. आता तोंडावर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून, कृषी विभागामार्फत खत वाटपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 200 शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते बी-बियाणे पोहोचवीले जाणार आहेत. त्याचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या करण्यात आले.

शेतकऱ्यांना बांधावरच मिळणार खतं आणि बी बियाणे
खरीप हंगाम हा अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. आतापर्यंत लॉकडाऊनमुळे घरात बसलेले शेतकरी शेतीच्या मशागतीकडे वळले आहेत. तर काही शेतकरी हे खते बी-बियाणे याचीही तयारी करीत आहेत. मात्र, अजून कृषी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी कृषी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये खते बी-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची एकच झुंबड उडेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृषी विभागामार्फत खते बी-बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 1 हजार 200 शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे औषधी वाटपाता कार्यक्रम केला जाणार आहे.

कोरोनासारख्या महाभयंकर आजारामध्ये शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबावी, तसेच गर्दी टाळता यावी, शिवाय पैशाची देखील बचत व्हावी. खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गटातील एकाच सदस्याने येऊन इतर शेतकऱ्यांची खते बी-बियाणे खरेदी करावी. तसेच त्यांच्या शेतावर पोहोचवावी असे मत कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सकाळी करण्यात येणार होते. त्यामुळे पहाटे 6 वाजेपासून शेतकरी विना अन्नपाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. मात्र, एक वाजून गेला तरी उद्घाटन होत नसल्याने शेतकरी चांगले हैराण झाले होते. शेतकरी काढता पाय घेण्याच्या तयारीत असताना, पालकमंत्री आल्या अन सर्वप्रथम या उपक्रमाचे उद्घाटन केले. तेव्हा शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. खरोखरच हा कृषी विभागाचा उपक्रम कोरोना सारख्या महाभयंकर आजारात कितपत योग्य ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details