हिंगोली - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकरी (Farmers Protest Of State Government) आंदोलन करीत आहेत. मात्र सरकार ने लक्ष न दिल्याने शेतकरी आता चांगलेच संतापलेले आहेत. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध (Pouring Milk On Road get government attention) नोंदविला आहे. अतिवृष्टी पासून झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई देण्यापासुन वंचित ठेवल्यामुळे, शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. हिंगोलीतल्या गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकून आंदोलन केले आहे. लेखी आश्वासन मिळे पर्यंत अजिबात आंदोलन माघे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Farmers Protest : रस्त्यावर दूध फेकून शेतकऱ्यांनी केला निषेध; सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न - सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन (Farmers Protest Of State Government) करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार ने लक्ष न दिल्याने शेतकरी आता चांगलेच संतापलेले आहेत. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध नोंदविला (Pouring Milk On Road get government attention) आहे.
सरकारचे दुर्लक्ष :अतिवृष्टी यादी मध्ये गावाचा समावेश करावा, तसेच नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याच्या मागणीसाठी, जिल्ह्यात विविध ठिकाणी मागील आठ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र अजूनही सरकारने शेतकऱ्याच्या मागणीकडे अजिबात लक्ष दिलेले नाही.
त्यामुळेच गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध नोंदविला आहे. तेव्हा सरकार खरोखरच शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. Farmers Protest