हिंगोली- ऑगस्ट महिना संपत आला असला तरीही हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करतो आहे. तर दुसरीकडे मात्र नवनिर्वाचित पालकमंत्री अतुल सावे हे ध्वजारोहणानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आपण जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचे सांगितले होते. हिंगोली जिल्ह्याला पावसाची गरज असल्याचे शेतकरी मोठ्या पोटतिडकीने सांगत आहेत.
मुख्यमंत्रीसाहेब कृत्रिम पावसाची गरज हिंगोलीतही, शेतकऱ्यांची आर्त हाक - rain in hingoli
हिंगोली जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अतुल सावे हे ध्वजारोहणानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी आपण जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र १२ दिवस उलटूनही अजून काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी फ़ारच संतापलेले आहेत.
औरंगाबाद, जालना परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे आहेत. तर विहिरी व तलावांची देखील पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासुनच निर्माण झाला आहे. गंभीर बाब म्हणजे सोयाबीन आणि मुग ही पिके ऐन भरात असताना दाणे वाढण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे 15ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी आले असता, त्यानी हिंगोली जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले होते. मात्र 12 दिवस उलटूनही अजून काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी फ़ारच संतापलेले आहेत.
बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने कर्जबाजारी होऊन खरिपाची पेरणी केली. मध्यंतरी झालेल्या पावसाने इतर पिके बहरली. मात्र भुईमूग भरण्याच्या पावसात गायब झाल्याने पीक हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. कृत्रिम पावसाचे प्रयोग मात्र जालना, औरंगाबाद अहमदनगर याच भागात होत आहेत. म्हणून काही शेतकरी कंटाळून मुखमंत्र्यांना सांगतात की, साहेब हिंगोली जिल्ह्यात ही पावसाची खरी गरज आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचे प्रयोग हिंगोली जिल्ह्यातही करावेत अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांतुन केली जात आहे.