महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर शेतकऱ्याचा मृत्यू

रघुनाथ राजाराम कुरुडे (४०) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. कुरुडे हे वसमत येथून बाजार करून पूर्णा ते अकोला जाणाऱ्या रेल्वेने शिरळी रेल्वे स्थानकावर उतरले. रेल्वे उशिरा आल्याने, ते पायी गावात चालत आले. गावातून नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावर जात होते. मात्र, रेल्वे पुलाखाली पाणी असल्याने ते पुलावरून दुसऱ्या दिशेला जात होते. मात्र, पुलावरून जात असताना त्यांचा पाय रेल्वे पटरीमध्ये अडकला.

हिंगोली

By

Published : Aug 22, 2019, 2:42 PM IST

हिंगोली- अकोला - पूर्णा रेल्वे मार्गावरील पुलाखाली पावसाचे साचलेल्या पाण्याची अद्याप रेल्वे प्रशासनाने योग्य निचरा लावलेला नाही. त्यामुळे ये-जा करताना पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असाच एक पादचारी पुलाखाली पाणी असल्याने रेल्वे पटरी ओलांडून दुसऱ्या दिशेला जात होता. मात्र, त्याचा पटरीत पाय अडकल्याने रेल्वेखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास वसमत तालुक्यातील शिरळी येथे रेल्वे पुलावर घडली.

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर शेतकऱ्याचा मृत्यू

रघुनाथ राजाराम कुरुडे (४०) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. कुरुडे हे वसमत येथून बाजार करून पूर्णा ते अकोला जाणाऱ्या रेल्वेने शिरळी रेल्वे स्थानकावर उतरले. रेल्वे उशिरा आल्याने, ते पायी गावात चालत आले. गावातून नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावर जात होते. मात्र, रेल्वे पुलाखाली पाणी असल्याने ते पुलावरून दुसऱ्या दिशेला जात होते. मात्र, पुलावरून जात असताना त्यांचा पाय रेल्वे पटरीमध्ये अडकला. रात्रीची वेळ असल्याने त्यांना त्या ठिकाणी काहीच दिसत नव्हते. अशातच रात्रीच्या सुमारास रेल्वे आली आणि यामध्ये कुरुडे यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी त्यांच्या शरीराचे पूर्णपणे तुकडेच झाले होते, तर मृतदेहाजवळच बाजाराची पिशवीदेखील पडली होती. सध्याच्या स्थितीत अकोला पूर्णा रेल्वे मार्गावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पाऊस उघडून पंधरा दिवस लोटले असले तरीही रेल्वे प्रशासनाने अद्याप या पाण्याचा निचरा केलेला नाही. याचा फटका पादचाऱ्यांना बसत आहे. हे पाणी वाहते करण्याच्या मागणीसाठी तेथील गावातील ग्रामस्थांनी आंदोलने केली होती. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. अजून हे प्रशासन किती बळी घेणार, असा सवाल आता शिरळी येथील ग्रामस्थ करत आहेत. पाणी केवळ शिरळी येथील पुलाखालीच साचलेले नसून पूर्णा - अकोला रेल्वेमार्गावरील शिरळी, धामणी, कारंजाळा, हिंगोली, मालसेलू, कनेरगाव नाका या गावातील रेल्वे पुलाखालीही पाणी साचले आहे.

मागील वर्षी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुलाखाली साचलेले पाणी वाहते केले होते. यावर्षी मात्र अद्याप हे पाणी वाहते करण्यासाठी प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेले नाही. हिंगोली येथील रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अनेकजण रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details