महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐकावं ते नवलंच! हिंगोलीत शेतकऱ्याने चक्क अफूची फुलवली बाग; पोलिसांच्या धाडीत रोपे जप्त

हिंगोलीत आतापर्यंत गांजाची शेती केल्याचे समोर आले होते. मात्र, आता चक्क अफूची बाग फुलवल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळापूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली अफूची शेती
हिंगोलीत शेतकऱ्याने केली अफूची शेती

By

Published : Feb 8, 2020, 3:21 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात आतापर्यंत गांजाची शेती केल्याचे समोर आले होते. मात्र, आता चक्क अफूची बाग फुलवल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळापूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जवळपास दीड लाख रुपये किंमतीच्या अफूची ही शेती असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा... नागपुरात मध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

कळमनुरी तालुक्यातील भोसी शिवारात रामदास गणाजी खोकले (रा. कुंभारवाडी) या शेतकऱ्याने शेतात अफूची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बाळापूर पोलिसांनी भोसी शिवारात धाव घेतली. त्यावेळी त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात अफूची लागवड केल्याचे दिसून आले. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लागवड केल्याचे पोलीस आणि परिसरात कोणाच्याही लक्षात आले नाही. या शेतकऱ्याने अफूच्या बागेत आंतरपीक म्हणून कोथिंबीरचेही पीक घेतले हेते.

हेही वाचा.... रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

पोलिसांनी अफूची दीड हजार झाडे ताब्यात घेतला आहे. तसेच शेतात पोलिसांची धाड पडल्याची माहीत मिळताच बाग फुलवणारा शेतकरी फरार झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details