हिंगोली - कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वसमत तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. सुभानजी सूर्यवंशी (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून हिंगोलीत शेतकऱ्याची आत्महत्या, महिन्यातील पाचवी घटना - कर्जबाजारीपणाला कंटाळून हिंगोलीत शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वसमत तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. सुभानजी सूर्यवंशी (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यात काही केल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र कमी होत नाही. यावर्षी सलग नऊ ते दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मृत देवराव सूर्यवंशी यांच्याही पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच मुलीच्या लग्नात घेतलेले हात उसने पैसे व बँकेचे कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर फेडायचा कसा याच चिंतेत ते मागील काही दिवसापासून राहत असत. याच निराशेतून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात राजकुमार देवराव सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून अकस्मीत मृत्यूची नोंद केली आहे. जिल्ह्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या महिन्यातील ही पाचवी आत्महत्या आहे.