हिंगोली - जिल्ह्यात फाटा येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नानासाहेब रंगनाथ भवर (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नानासाहेबांच्या मुलीचा ७ मे रोजी विवाह सोहळा होता. मात्र, मुलीच्या विवाहासाठी पैशांची जुळवाजुळव न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली.
हिंगोलीत कर्जबाजारी शेतकऱ्याची मुलीच्या विवाहापूर्वीच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या - drought
नानासाहेब रंगनाथ भवर या शेतकऱ्यांच्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी विवाह जुळला होता. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विवाह पुढे ढकलला होता.
हट्टा येथील नानासाहेब रंगनाथ भवर या शेतकऱ्यांच्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी विवाह जुळला होता. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विवाह पुढे ढकलला होता. दुष्काळा समोर हतबल झालेल्या नानासाहेबांनी आपल्या मुलीचा ७ मे २०१९ रोजी विवाहाचा महूर्त ठरला होता. विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू होती. मात्र भवर यांना पैशाचे नियोजन जुळले नाही.
त्यांच्यावर आधीचेही बँकेचे कर्ज असल्याने बँकेने त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे आता मुलीचा विवाह करण्यासाठी पैसा आणायचा तरी कुठून? या चिंतेत ते मागील काही दिवसापासून राहत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या चिंतेतच भवर यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावावर केवळ तीस गुंठे शेतजमीन असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.