महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन वेळा पेरणी करुनही उगवण न झाल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या - vitthal dorale commit suicide

विठ्ठल डोरले यांनी तीन वेळा पेरणी करुनही उगवण न झाल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. त्यांना खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती. डोरले यांच्या आत्महत्येमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Vitthal Dorale commit suicide
विठ्ठल डोरले या शेतकऱ्याची आत्महत्या

By

Published : Jul 19, 2020, 11:29 AM IST

हिंगोली-शेतकरी यावर्षी निसर्गासमोर चांगलेच हतबल झाले आहेत. नियमित होत असलेल्या पावसाने शेतीतील पीक सडून गेले. काही ठिकाणी तीन वेळेस पेरणी करूनही पिकांची उगवण झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यातील राहोली बु येथील एका शेतकऱ्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

विठ्ठल बाबाराव डोरले (40) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. डोरले यांना मालकीची एक एकर शेती असून, एवढ्यावरच कुटुंबाचा गाडा हकने शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी गावातीलच एका व्यक्तीची पाच एकर जमीन बटईने केली. यंदा वेळेतच पाऊस सुरु झाल्याने, खरीप पेरणीचा हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा त्यांना होती.

मृग नक्षेत्रात पेरणी आटोपली मात्र बियाणांची उगवणच झाली नाही. त्यामुळे कशी बसी उसनवारी करून, दुसऱ्या वेळेस ही पेरणी केली तरीही उगवण झालीच नाही.शेतकऱ्याने हार न मानता तिसऱ्यांदा पेरणी केली. मात्र, त्याही बियाण्याची उगवण झालेली नसल्याने, शेतकरी डोरले चांगलेच गोंधळून गेले. मागील काही दिवसांपासून शेतकरी डोरले हे अस्वस्थ होते. अखेर त्यानी घराच्या बाजूला असलेल्या पडक्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

डोरले हे घरात न दिसल्याने त्यानी त्यांचा बराच शोध घेतला असता पडक्या घरात त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, आमदार सुभाष चव्हाण यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही केल्या शेतकरी आत्महत्या कमी होत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details