महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्या मुलां-बाळांना जगवायचं कसं? पिकाचं नुकसान पाहून शेतकऱ्याने आईजवळ व्यक्त केली शेवटची खंत.. - farmer death in sengaon

गावाकडे पती येण्यापूर्वीच पत्नीने सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली होती. त्यानंतर ती मुला बाळांना घेऊन दिवाळ सणासाठी माहेरी गेली. इकडे गायकवाड मुंबई वरून परतताच शेताची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीनची झालेली धूळधाण पाहून त्यांचा हिरमोड झाला होता. ते शेतातून परत आले तेव्हापासून सतत कर्जाचा विचार करीत होते. हातचे पीक वाया गेले होतं, तरी देखील आई वडील त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.

माझ्या मुलां-बाळांना जगवायचे कसं? पिकाचं नुकसान पाहून शेतकऱ्याने आईजवळ व्यक्त केली शेवटची खंत..

By

Published : Nov 10, 2019, 8:27 AM IST

Updated : Nov 10, 2019, 12:01 PM IST

हिंगोली- परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकरी पुरता मोडकळीस आला आहे. कित्येकांनी तर झालेले नुकसान पाहवत नसल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारून आपली जीवनयात्रा संपवली. अशीच एक हृदयद्रावक घटना घडलीय जिल्ह्यातील सेनगाव पोलीस हद्दीत. केवळ दोनच एकर शेती अन कशी बशी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, यावर आपलं काही भागणार नाही म्हणून ते कामासाठी मुंबईला गेले. मिळेल ते काम केलं, अन सोयाबीन काढण्यासाठी ते गावाकडे परतले. गावी आल्यावर शेतात पोहोचले तर पावसामुळे सर्व पिकाची धूळधाण झालेली. त्यावेळी मात्र त्यांच्या पायातले अवसानच गळाले. कारण त्यांना चिंता लागली होती ती डोक्यावरील कर्ज फेडायची.. शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या आई जवळ मूलं बाळं जगवण्याची खंतही व्यक्त केली. मात्र आईने धीर दिला अन् ती भजनाच्या कार्यक्रमासाठी गेली. परत आल्यानंतर पाहते तर काय तिच्या काळजाच्या तुकड्याने गळफास घेतला होता.

मधुकर रामभाऊ गायकवाड (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रामभाऊ गायकवाड यांना दोन मुले आहेत. तर मधुकर हा लहान आहे. वडिलांनी दोघांनाही शेती वाटून दिली तर दोघांच्या नावावर दोन-दोन एकर शेती आली. मागील तीन ते चार वर्षभरापासून शेतीमध्ये समाधानकारक उत्पन्न निघत नव्हते. तसेच दोन एकर शेतीत काहीच भागत नसल्याने मधुकर हे मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकत असत. यंदा पीक परिस्थिती बरी होती. त्यामुळे शेतीचे अन आपल्या कष्टाच्या पैशाची कशीतरी जुळवाजुळव करून यंदा डोक्यावर असलेले खासगी कर्ज फेडायचा निर्धार मधुकर यांनी पक्का केला होता. त्यामुळे पेरणी आटोपून ते मुंबई येथे कामाला गेले होते. मिळेल ते काम केले. मात्र काही दिवसांपासून तिथेही काम मिळत नसल्याने, अन सोयाबीन काढणीस आल्याने ते गावी परत आले.

माझ्या मुलां-बाळांना जगवायचं कसं? पिकाचं नुकसान पाहून शेतकऱ्याने आईजवळ व्यक्त केली शेवटची खंत..

गावाकडे पती येण्यापूर्वीच पत्नीने सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली होती. त्यानंतर ती मुला बाळांना घेऊन दिवाळ सणासाठी माहेरी गेली. इकडे गायकवाड मुंबईवरून परतताच शेताची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीनची झालेली धूळधाण पाहून त्यांचा हिरमोड झाला होता. ते शेतातून परत आले तेव्हापासून सतत कर्जाचा विचार करीत होते. हातचे पीक वाया गेले होतं, तरी देखील आई वडील त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शेवटच्या दिवशी शेतकरी गायकवाड यांचा धीर सुटला आणि आपल्या मनातील कर्जाची, मुलाबाळाच्या शिक्षणाची, संगोपणासाठी येणाऱ्या पुढील अडचणीची खंत बोलून दाखवली.

मुलाचे दु:ख आईला समजत होते. निसर्गाने साथ दिली नव्हती, सरकारही तत्काळ मदतीला धावून येण्याची चिन्हे दिसत नव्हती. तिने परिस्थितीने हतबल झालेल्या मुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिलाही परिस्थितीची जाणीव होती. आईचा जीवही मुलासाठी कासावीस होत होता. मुलाला धीर देऊन ती माय माऊली भजनासाठी म्हणून मंदिरात गेली. त्यावेळी मुलगा घरी एकटाच होता. थोड्यावेळाने गायकवाड यांची आई घरी परतली तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्यावर आभाळच कोसळले. मुलाने घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. माझा मुलगा शेवटपर्यंत आपल्या मुला बाळांच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होता, अशा आठवणी सांगताना त्या आईच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा ओघ काही थांबत नव्हता. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केलीय.

Last Updated : Nov 10, 2019, 12:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details