हिंगोली -सलग नऊ दिवस पावसाच्या हाहाकारामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीपाचे पीक वाया गेल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच धक्का सहन न झालेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या शेतकऱ्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारने अजुनही मदत न केल्याने या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - ४ नोव्हेंबरला राज्यात नवीन राजकीय समीकरण? शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट
प्रकाश इंगोले या शेतकऱ्याचा प्रयत्न केला होता. हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णता कंबरडेच मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यादेखत वाय गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अनेकांची स्वप्न धुळीत मिसळली आहेत. या हंगामात डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पीक वाया गेल्याने ती पूर्णपणे फोल ठरली आहे.