हिंगोली - वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते. परत आज 12 वाजून 32 मिनाटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांत अजूनही भीतीचे वातावरण आहे.
अधून-मधून जाणताता भूकंपाचे धक्के -
पांगरा शिंदे परिसरातील अनेक भागात मागील दोन-तीन वर्षांपासून अधून-मधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ हे भयभीत झालेले आहेत. सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागून गेले आहेत. शनिवारी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर नोंद झाली नसली, तरीही ग्रामस्थ हे घाबरलेले आहेत.