महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसमत तालुक्यात जमीन हादरली; भूकंप सदृश्य धक्क्यांमुळे ग्रामस्थ भयभीत - वसमतमध्ये भूकंपाचे धक्के

तालुक्यातील पिंपळदरी सोडेगाव कुरुंदा यासह आदी भागात बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास जमीन हादरली. त्यानंतर या घटनेबाबतची माहिती ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला दिली आहे. अशा प्रकार जमीन हादरण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने भूकंपाच्या भीतीने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत.

वसमत तालुक्यात जमीन हादरली
वसमत तालुक्यात जमीन हादरली

By

Published : May 19, 2021, 10:31 AM IST

हिंगोली- वसमत तालुक्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून भूगर्भात अधूनमधून सौम्य धक्के जाणवत आहेत. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास जमीन हादरल्याचा प्रकार घडला. मात्र या हादऱ्यांची रिस्टरस्केलवर नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापना कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या भूकंप सदृश्य धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आज जाणवलेले भूगर्भातील हादरे हे यापू्र्वीपेक्षा अधिक तीव्रतेचे होते, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.


मागील काही वर्षापासून वसमत तालुक्यातील अनेक गावात अधून-मधून जमिनीतून भूकंप सदृश्य हादरे बसत आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पिंपळदरी सोडेगाव कुरुंदा यासह आदी भागात बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास जमीन हादरली. त्यानंतर या घटनेबाबतची माहिती ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला दिली आहे. अशा प्रकार जमीन हादरण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने भूकंपाच्या भीतीने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. आज सकाळी जमीन हादरल्याच्या घटनेनंतर अद्याप या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले नव्हते. त्यामुळे जमीन हादरण्यामागे नेमके भूकंपाचे कारण होते की इतर हे अद्याप समजू शकले नाही.

नेहमीचीच झाली ग्रामस्थांना सवय-

सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत लॉकडाऊन असल्याने शक्यतो कोणीही घराबाहेर पडत नाही. अशाच परिस्थितीत या भागात भूकंप सदृश सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या भीतीपोटी मागील अनेक वर्षापासून घराबाहेर असलेल्या मोकळ्या मैदानात रात्रीच्या वेळी वास्तव्य करीत आहेत, तर काही जण शेतामध्ये जाऊन राहत आहेत. मात्र, आज जमीन हादरल्यानंतर तो नक्की भूकंपच होता, हे अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट झाले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details