महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 14 जणांवर गुन्हा दाखल - Hingoli latest news

प्रत्येक वर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करताना अनेकजण ओल्या पार्टीचा जंगी बेत आखतात. रात्रभर धिंगाणा घातला जातो, यावेळी अनेकदा मद्य पिऊन दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते

Hingoli
हिंगोलीत 'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 24 जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Jan 1, 2020, 10:48 AM IST

Updated : Jan 1, 2020, 11:49 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात वाहतूक शाखेकडून जुने वर्ष संपण्याच्या व नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 14 वाहने जप्त करण्यात आली. तर शहर पोलीस ठाण्यात दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

'ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह'चा 24 जणांवर गुन्हा दाखल

हेही वाचा - गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत; अपघातमुक्तीचा संदेश

प्रत्येक वर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करताना अनेकजण ओल्या पार्टीचा जंगी बेत आखतात. रात्रभर धिंगाणा घातला जातो, यावेळी अनेकदा मद्य पिऊन दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे थर्टी फर्स्टला पोलीस अधिकारी, कर्मचारीही गोंधळ होऊ नये, म्हणून रस्त्यावर आपले कर्तव्य बजाविण्यासाठी सज्ज होते.

हेही वाचा - दुचाकी आणि बसच्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर; मदतीऐवजी लोक करत होते चित्रीकरण

ही मोहीम रात्री उशिरापर्यंत राबवण्यात आली. तर दुसरीकडे खटकाळी बायपास भागात पहाटे 5 वाजेपर्यंत वाहन चालकांना 1 ग्लास दूध देत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याचाही उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात अनेकांनी दुधाचा लाभ घेतला.

Last Updated : Jan 1, 2020, 11:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details