महाराष्ट्र

maharashtra

पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणारच - सुनील केंद्रेकर

By

Published : Nov 20, 2019, 1:51 PM IST

मोबाईलवर विमा कंपनीकडून वेगवेगळे संदेश येत असतील तरीही त्याबाबत चिंता करू नये. ज्यांचे अर्ज स्वीकारले असतील, त्यांना नुकसानीचे पैसे देणे बंधनकारक असल्याचे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा हिंगोली दौरा

हिंगोली -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे बुधवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हमखास मदत मिळणारच, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

विभागीय सुनील केंद्रेकर यांची प्रतिक्रिया...

मोबाईलवर विमा कंपनीकडून वेगवेगळे संदेश येत असतील, तरीही त्याबाबत चिंता करू नये. ज्यांच्या पिकांचे पंचनामे झाले आहे. व ज्यांचे अर्ज स्वीकारले असतील, त्यांना पैसे देणे बंधनकारक असल्याचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा... दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक, येत्या दोन दिवसात पेच सुटण्याची शक्यता

हिंगोली जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मूळ गावाला भेट दिली. प्रारंभी आयुक्तांनी येलदरी धरणास भेट देत, तेथील गळतीची पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले. नंतर वनविभागाच्या रोपवाटीकेची पाहणी केली. गावी जाताना त्यांना नरसी येथे संत नामदेवांचे दर्शन घेतले, नंतर त्यांनी गावास भेट दिली. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर माध्यमाशी सवांद साधला.

हेही वाचा... जगातील कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी

संपूर्ण मराठवाडा आपण फिरलोय. मुसळधार पावसाने संपूर्ण मराठवाड्यातच नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीसाठीच सरकारच्या मदतीची गरज असते, राज्यपालांनी ती मदत जाहीर केली आहे. तसा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. या मदत वाटपाचे नियम हे पीक विमा वाटप पद्धतीपेक्षा वेगळे असतात. पीक विमा कंपनीच्या तक्रारीची बाब आपल्याला समजली आहे. त्या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे माहिती घेतलेली आहे, असे केंद्रेकर यावेळी म्हणाले. पीकविमा कंपन्यांनी पंचनामे करावेत, अन्यथा आम्ही केलेले पंचनामे हे कंपनीला मान्यच करावे लागतील, असे स्पष्ट शब्दात केंद्रेकरांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा... एकनाथ शिंदे बोलतात एक वागतात एक, ठाणे काँग्रेसचा आरोप

आयुक्त केंद्रेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात त्यांनी आपले गावाविषयी असलेले प्रेम बोलून दाखवले. तसेच बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गावाचा कायापालट करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विविध शासकीय योजनातून गावाचा विकास करण्यासाठी तोंडी सूचना दिल्या. तसेच अनेक दिवसांपासून दारूबंदीसाठी सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीवर अद्याप कारवाई का केली नाही? याबाबत गोरेगाव पोलिसांना त्यांनी विचारणा केली.

हेही वाचा... जेसीबीने बैलाला ठार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल; इंदापूर तालुक्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details