महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ नगरीत 'हर हर महादेव' आणि 'बम बम भोले'चा गजर दुमदुमला असून, रात्री दोन वाजता अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.

nagnath jyotirling  mahashivratri
महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By

Published : Feb 21, 2020, 11:53 AM IST

हिंगोली -देशभरामध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ नगरीत 'हर हर महादेव' आणि 'बम बम भोले'चा गजर दुमदुमला. रात्री दोन वाजता अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. मध्यरात्रीपासून नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक अलोट गर्दी करीत आहेत. तहसीलदार पांडुरंग माचेवाड, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमीत्त औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

हेही वाचा -भिमाशंकर चरणी महाशिवरात्री निमित्त शासकीय महापूजा संपन्न

पुजा आटोपल्यानंतर पहाटे 2 वाजता दर्शनासाठी मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक औंढा नगरीत दाखल झालेले असून संपूर्ण मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर गाभाऱ्यातही फुलांच्या माळाणी नागनाथाच्या पिंडीची सजावट केली आहे. फुलांच्या सजावटीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर हा उजळून निघाला आहे. लांबलचक लागलेल्या दर्शन रांगेत भाविक पहाटे पासून सहभागी झालेले आहेत. शिवाय भाविकांची रात्रीपासून ये-जा सुरू आहे.

हेही वाचा -पुढील काळात काम करण्याची ताकत मिळावी; वळसे-पाटलांची भीमाशंकर चरणी प्रार्थना

ABOUT THE AUTHOR

...view details