हिंगोली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागील दोन दिवसांपासून राज्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहाणीदौऱ्यावर आहेत. काल उस्मानाबाद दौरा उरकून आज सकाळीच ते हिंगोलीत दाखल झाले. काही वेळात फडणवीस परभणीत पोहोचणार आहेत.
कालच देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे स्थनिक नेते उपस्थित होते.
उस्मानाबादमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या पिकाचं झालेल्या नुकसानाचा फडणवीसांनी आढावा घेतला.